सिल्लोड, (प्रतिनिधी) सिल्लोड येथे थोर समाज सुधारक, राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त शहरातील संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, कृउबा समितीचे संचालक नंदकिशोर सहारे, न.प.तील शिवसेना गटनेता सुधाकर पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका राजश्री निकम, नगरसेवक रउफ बागवान, अकिल बरसईकर, विशाल जाधव, शेख बाबू, आसिफ बागवान, जुम्मा खा पठाण, नूर मोहंमद कुरेशी, सिद्धेश्वर आहेर, जीतू आरके, सय्यद पाशु, शेतकरी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र बन्सोड, खरेदी विक्री संघाचे संचालक संजय मुरकुटे युवासेनेचे शिवा टोम्पे, फहिम पठाण, सखाराम आहिरे, दिलीप वाघ, राजू सुरडकर, सुनील पांडुरंग दुधे, आनंद सिरसाट, सुरेश पैठणकर, सतीश सिरसाट, रमेश जाधव, गणेश शेलार, सुनीता आरके, कमलबाई फुलसौन्दर्य आदींची उपस्थिती होती.














